मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अजनी स्थानकावर सध्या सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कार्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचलीत करण्यात येत आहे. अजनी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 हे 12 सप्टेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक करण्यात आले आहेत. या ब्लॉकमुळे ट्रेनच्या परिचालनमध्ये खालील बदल करण्यात आले आहेत:
खालील गाड्या अजनी स्थानकाऐवजी नागपूर स्थानक निघतील किंवा संपतील.
सुधारित गाड्यांचे प्रस्थान/आगमन:

- 12120 अजनी अमरावती एक्सप्रेस (दैनिक):
o प्रवास सुरू दिनांक: 12.09.2024 ते 10.12.2024 पर्यंत
o प्रस्थान: नागपूर स्थानकावरून 18:20 वाजता - 12119 अमरावती – अजनी एक्सप्रेस (दैनिक):
o प्रवास सुरू दिनांक: 12.09.2024 ते 10.12.2024 पर्यंत
o आगमन: नागपूर स्थानकावर 08:25 वाजता - 22124 अजनी पुणे एक्सप्रेस (मंगळवार):
o प्रवास सुरू दिनांक: 17.09.2024 ते 10.12.2024 पर्यंत
o प्रस्थान: नागपूर स्थानकावरून 19:40 वाजता - 22123 पुणे अजनी एक्सप्रेस (शनिवार):
o प्रवास सुरू दिनांक: 13.09.2024 ते 06.12.2024 पर्यंत
o आगमन: नागपूर स्थानकावर 05:00 वाजता - 22140 अजनी पुणे एक्सप्रेस (रविवार):
o प्रवास सुरू दिनांक: 15.09.2024 ते 08.12.2024 पर्यंत
o प्रस्थान: नागपूर स्थानकावरून 19:40 वाजता - 22139 पुणे अजनी एक्सप्रेस (रविवार):
o प्रवास सुरू दिनांक: 14.09.2024 ते 07.12.2024 पर्यंत
o आगमन: नागपूर स्थानकावर 13:00 वाजता
अजनी स्थानकावरील थांबे तात्पुरते रद्द:
ब्लॉक कालावधी दरम्यान अजनी स्थानकावर या कालावधीत काही गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. खालील गाड्या अजनी स्थानकावर थांबणार नाहीत. प्रवाशांनी या गाड्यांमध्ये चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी नागपूर स्थानकाचा वापर करावा:
• 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस (दैनिक)
• 11403 नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस (मंगळवार, शनिवार)
• 12106 गोंदिया – सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस (दैनिक)
• 12136 नागपूर – पुणे एक्सप्रेस (सोमवार, बुधवार, शनिवार)
• 12114 नागपूर – पुणे गरीब्रथ एक्सप्रेस (मंगळवार, शुक्रवार, रविवार)
• 12140 नागपूर – सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस (दैनिक)
• 18030 शालीमार – एलटीटी एक्सप्रेस (दैनिक)
प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे. सर्व प्रभावित गाड्या नागपूर स्थानकावरून सुरू होतील किंवा संपतील. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि अजनी स्टेशनच्या पायाभूत सुविधा वाढवण्याचे काम करत असताना प्रवाशांच्या सहकार्याची प्रशंसा करतो. भविष्यात चांगल्या सुविधा आणि कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी या सुधारणा महत्त्वपूर्ण आहेत.


