भुसावळ विभागात गालन स्थानक येथे विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

भुसावळ : भुसावळ विभागाच्या इगतपुरी-भुसावल खंड दरम्यान गालन स्थानक येथे अप व डाउन लूप लाईन्सचा विस्तार करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे.

या नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे प्रवासी गाड्यांमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत

मेल/एक्सप्रेस गाड्यांचे रद्दीकरण:

  1. ट्रेन क्रमांक 12114 नागपूर – पुणे एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 रोजी रद्द.
  2. ट्रेन क्रमांक 12113 पुणे – नागपूर एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 14.09.2024 रोजी रद्द.
  3. ट्रेन क्रमांक 11025 अमरावती – पुणे एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  4. ट्रेन क्रमांक 11026 पुणे – अमरावती एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  5. ट्रेन क्रमांक 11119 इगतपुरी – भुसावल मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  6. ट्रेन क्रमांक 11120 भुसावल – इगतपुरी मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  7. ट्रेन क्रमांक 11113 देवळाली – भुसावल मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  8. ट्रेन क्रमांक 11114 भुसावल – देवळाली मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  9. ट्रेन क्रमांक 01211 बडनेरा – नासिक विशेष, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  10. ट्रेन क्रमांक 01212 नासिक – बडनेरा विशेष, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
  11. ट्रेन क्रमांक 02187 रेवा – मुंबई विशेष, प्रवास सुरू दिनांक 12.09.2024 रोजी रद्द.
  12. ट्रेन क्रमांक 02188 मुंबई – रेवा विशेष, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 रोजी रद्द.

प्रवाशांना सुचित करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.