भुसावळ : तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कुऱ्हे ( पानाचे ) येथे नवीन दुरक्षेत्र पोलीस चौकीचे उद्घाटन आ. संजय सावकारे व पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते सोमवारी ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत वित्तीय वर्षाच्या प्राप्त निधीतून नवीन दुरक्षेत्र पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटन याप्रसंगी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून कुऱ्ह ( पानाचे ) येथे अद्यायावत असे नवीन पोलीस चौकीची निर्मीती करण्यात आली आहे.
या परिसरातील पंचक्रोशीत नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे अशी माहिती आ. सावकारे यांनी बोलतांना दिली आहे.


