LIC भुसावळ, शाखा ९६५ चा ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न ;

भुसावळ –

भारतातील नंबर एक असलेली वित्त संस्था, भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा भुसावळ येथे 68 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शाखा प्रबंधक दीपक पाटील आणि प्रमुख पाहुणे श्रीपाद पुंडे (AGM IDBI, भुसावळ) उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित सर्व कार्यालयीन कर्मचारी वृंद, विमा अभिकर्ता, विमा ग्राहक यांच्यासमोर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दीपक पाटील यांनी १९५६ स्थापना दिवस ते २०२४, या 68 वर्षातील एलआयसी ने केलेल्या भरीव कामगिरीची माहिती दिली. तर प्रमुख पाहुणे श्रीपाद पुंडे यांनी एलआयसी ने संपादन केलेला विश्वास हा अतुलनीय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खास शैलीत महेश कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी) यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन, शाखा व्यवस्थापक अमोल भावसार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.