भुसावळ – येथीलन कला, विज्ञान व पु.ओं .नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (कनिष्ठ महाविद्यालय) मध्ये 28/08/2024 बुधवार रोजी 2024-25 साठी पालक शिक्षक संघ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सभेत इ. 11वी व इ.12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करून गुणगौरव करण्यात आला. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी महेश पवार व सचिव पदी आर.एम.खेडकर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहनभाऊ फालक , चेअरमन महेशभाऊ फालक,सचिव विष्णुभाऊ चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.संस्थेचे कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच उपप्राचार्य वाय.एम.पाटील सरांनी प्रास्ताविक सादर केले. या सभेत कु.पल्लवी संतोष सुरवाडे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन आर.पी.मसाने यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन एम.एल.गोसावी यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका स्वाती पाटील, समिती सदस्य एम.एच.सरोदे, आर.एम.पाटील, के. एम.राणे,एम.पी.चौधरी यांनी सहकार्य केले.



