भुसावळ – येथील सकल लेवा महिला मंडळाच्या वतीने बदलापुर येथील शाळेत घडलेला अत्याचाराविषयी व कलकत्ता येथील आरजीकल हॉस्पीटल मधील अत्याचार व निघृण हत्या याबाबतीत आज दिनांक २९ ऑगष्ट गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता प्रांतांधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात येवून निषेध करण्यात आला .

निवेदनात नमूद आहे की या घटनेतील दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे तसेच अशा घटनांना आळा बसावा म्हणुन प्रशासनाने लवकरात लवकर स्त्रिशक्ती कायदा अमलात आणावा . शाळा प्रशासन , कर्मचारी वर्ग व शिक्षक वृंद यांनी पण प्रसाशनाने दिलेल्या नियमांचे चोख पालन करावे. आदी मागणी केली आहे
निवेदन देते वेळी सकल लेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील , उपअध्यक्ष सौ प्रभा पाटील कोषाध्यक्ष सौ स्वाती भोळे कमेटी मेंबर सौ मेघा कुरकुरे , वैशाली चौधरी, मनिषा पाटील सदस्य मंडळ निलीमा महाजन, संगीता चौधरी, वंदना फेगडे, हर्षा चौधरी , उज्वला महाजन, जयश्री चौधरी, जयश्री पाटील, मनिषा बऱ्हाटे आदी महिला उपस्थित होत्या.


