कजगाव स्थानकावर उद्या रेल्वेचा ब्लॉक : सहा मेमू रद्द -सहा मेल-एक्स्प्रेस थांबविणार : रेल्वे प्रवाशांची पुन्हा होणार गैरसोय

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कजगाव रेल्वे स्थानकावरील तिसर्‍या रेल्वे लाईनीच्या कामासाठी मंगळवारी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे या मार्गावरील मेल, एक्स्प्रेस या सहा रेल्वे गाड्या मंगळवार, 27 विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील तर ईगतपुरी, देवळाली, नाशिक बडनेरा या सहा मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कजगाव स्थानकावर रेल्वेचा ब्लॉक
मंगळवार, 27 रोजी कजगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेतर्फे ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मंगळवारी सहा मेमू गाड्या रद्द केल्या आहे तर सहा मेल एक्स्प्रेस गाड्या या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविणार येणार आहेत. यात गोरखपूर एलटीटी एक्स्प्रेस एक तास, दिब्रुगढ-एलटीटी एक्सप्रेस 45 मिनिटे, एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस एक तास 45 मिनिटे, साई नगर शिर्डी-कालका एक्सप्रेस एक तास 45 मिनिटे, एलटीटी-भागलपूर एक्सप्रेस एक तास आणि मुंबई-लखनऊ एक्सप्रेस 30 मिनिटे रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

या गाड्या असतील रद्द
कजगावजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे मंगळवार, 27 ऑगस्टला 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू रद्द, भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द, देवळाली-भुसावळ मेमू रद्द, भुसावळ-देवळाली मेमू रद्द, नाशिक-बडनेरा विशेष मेमू गाडी रद्द, बडनेरा -नासिक विशेष मेमू गाडी रद्द करण्यात आली आहे.