भुसावळ : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी रविवारी भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना जळगाव येथे ने-आण करण्यासाठी 84 बसची सुविधा उपलब्ध केली होती. यासाठी भुसावळ आगाराने सोयगाव, सिल्लोड व अकोल्यातून 77 बसेस मागविल्या होत्या. तर 7 बस भुसावळ आगाराच्या होत्या. अश्या 84 बसमधून तीन हजार 385 महिलांना जळगावला ने-आण या बसच्या माध्यमातून केली गेली. दरम्यान, भुसावळ आगाराला 45 फेर्या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली.
जळगाव येथे आयोजित केलेल्या लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात आले. या कार्यक्रमास भुसावळ तालुक्यातील 38 गावांमधील महिलांने जळगावला कार्यक्रमाला घेऊन जाणे आणि परत गावात सोडून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी रात्री 2 वाजतात ठरलेल्या प्रत्येक गावात बस मुक्कामी पाठविण्यात आल्यात. सकाळी 8 वाजताच गावातील महिला बसद्वारे जळगावकडे रवाना झाल्यात. आणि दुपारी पुन्हा परत आल्यात. पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम आटोपल्यावर प्रत्येक गावातील बसला नंबर देण्यात आला होता, त्या नंबरचा फलकही बसवर लावला होता. त्याच बसमध्ये महिला बसून जळगाव गेल्यात व परत सुध्दा त्याच बसमध्ये परत आल्यात.
जळगाव येथील कार्यक्रमास लागणार्या बस या भुसावळ आगारात उपलब्ध नसल्याने या बस अन्य जिल्ह्यातून मागविल्यात यात सोयगाव येथून 20, अकोला येथून 20 तर सिल्लोड आगारातून 37 बस मागविण्यात आल्या होत्या, अश्या 77 बस बाहेरगावाहून भुसावळात येऊन येथून ग्रामीण भागात पाठविल्या होत्या. असे आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी सांगितले.

तळवेल, आचेगाव, दर्यापूरहून महिला गेल्या नाहीत
नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातामुळे तळवेल, आचेगाव व दर्यापूर भागातून एकही महिला जळगाव येथील कार्यक्रमाला गेली नसल्याने तेथील बस रद्द करण्यात आल्या. तळवेलमधील सात जणांचा नेपाळ येथे मृत्यू झाल्याने तसेच अन्य गावातील महिला सुध्दा गेल्या नाही. यामुळे पाच बस रद्द करण्यात आल्या आचेगावातून एका बसमधून 102 महिला, तळवेलमधून 112 महिला दोन बसमधून तर दर्यापूर येथील 52 महिला या एकाबसून जाणार होत्या मात्र कोणीही न गेल्याने पाच बस रद्द करण्यात आल्या.
आगारातून 10 बस एरंडोल, 7 बस या तालुक्यातील महिलांने जळगाव येथे नेण्यासाठी गेल्याने भुसावळ आगाराच्या 45 फेर्या रविवारी रद्द करण्यात आल्यात. यामुळे आगाराचे या फेर्यांचे माध्यमातून मिळणारे उत्पन्न दिड लाख मिळाले नाही. यात विशेष करून शालेय फेर्या रद्द करण्यात आल्या. तर नाशिक, शिर्डी, नागपूर या लांब पल्याच्या बस रद्द करण्यात आल्या.


