रावेर – रावेर तालुक्यातील मुंजलवाडी-कुसुंबा रस्त्यावरील वळणावर वार्यामुळे लिंबाचे झाड पडून मध्य प्रदेशातील एका इसमाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. रावेर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली.असून वडील व मुलगा दोघे रावेरात बाजारासाठी आले होते .
मध्य प्रदेशातील खडक्या नदी, पोस्ट हेलापडावा, ता.झिरन्या, जि.खरगोन येथील बदा मांगीलाल सोलंकी (४४) हे त्यांचा मुलगा चेतनसोबत मोटारसायकल शाहिन होंडा (क्र.एम.पी.10-0660 शुक्रवारी रावेर येथे ठिबक सिंचन नळ्या घेण्यासाठी आले होते. ठिबक नळ्यांचे एक बंडल घेऊन परत जात असतांना रावेर-पाल रोडवर मुंजलवाडी शिवारात रस्त्यावरील वळणावर रमेश पाटील यांच्या शेताजवळ सायंकाळी सव्वा चार वाजेचे सुमारास जोरदार वारा व पावसामुळे कडू निंबाचे झाड बदा सोलंकी यांच्या डोक्यावर पडल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मुलगा चेतन (14) हा किरकोळ जखमी झाला. रावेर

ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिकेचे चालक विशाल राणे, डॉ.सर्फराज खान यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याच्यावर डॉ. शुभांगी चौधरी यांनी उपचार केले. याबाबत घटनेतबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सतीष सानप करीत आहेत.


