गद्दारांनी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून दाखवावे-खासदार संजय राऊत : निष्ठावंत मेळाव्यात विरोधकांना आवाहन


पारोळा –
शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मात्र स्वार्थासाठी
दगा फटका देत गद्दारांच्या पक्षात सामील झालेल्या आमदारांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत
निवडून दाखवावे असे आवाहन विरोधकांना करत लूटमार व जाऊ तिथे खाऊ यांच्या संगतीत राहणा-यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता नक्कीच त्यांची जागा दाखवेल असा खणखणीत इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला तसेच आपल्या मनोगतात चौफेर फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. येथील बाजार समिती आवारात निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना नेते संजय सावंत, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष पाटील, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने, विष्णू भंगाळे, पारोळा तालुका अध्यक्ष प्रा. आर बी पाटील शहराध्यक्ष अशोक मराठे, माजी जि प सदस्य नाना महाजन, एरंडोल चे दशरथ महाजन , रवींद्र चौधरी, जगदीश पाटील, अमळनेरच्या एडवोकेट ललिता पाटील, डॉक्टर अस्मिता पाटील, महानंदा पाटील यांच्यासह जळगाव जिल्हा व एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळीच खासदार संजय राऊत यांनी आमदार यांच्यावर खडसून टीका करत शिवसेनेमुळे अनेक जण मोठे झाले
त्यांनी विश्वासघात करून विरोधकांचा हात धरला अश्या गद्दारांमुळेच महाराष्ट्राची सत्तेतील राजकारणांनी
वाट लावली आहे. महाराष्ट्रातून लुटायचे आणि गुजरातला न्यायचे असे धोरण सध्या सुरू आहे एवढेच नव्हे तर
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था सुद्धा
डबलघाईस आलेला आहे.
येणाऱ्या काळात उबाठा शिवसेना व मशालीची ताकद उभी करण्यासाठी व विरोधकांना जागा दाखवण्यासाठी मतदारांनी सज्ज राहावे असे आवाहन खासदार राऊत यांनी केले.
यावेळी डॉक्टर हर्षल माने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी आपल्या मनोगतात विरोधकांवर टीका करत मतदारसंघाची जनता निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी उभी आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक आर बी पाटील यांनी केले.
शेवटी मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.