अकोला – उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा मुलींचा लैंगिक छळ करणार्या शिक्षकाला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. एका मुलीच्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने दोषींवर तातडीने कारवाई केली. आरोपी शिक्षकाला गजाआड करण्यात केल्यानंतर त्यास बडतर्फ करण्यात आले तर शाळेच्या मुख्याध्यापकासह केंद्र प्रमुखाला बडतर्फ करण्यात आले आहे.

आरोपीला व्हावी कठोर शिक्षा
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बालकल्याण समिती व अधिकार्यांची बैठक घेतली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही बसविण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. आवश्यकतेनुसार निधीसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीने केली आहे.


