जळगाव – बदलापूर ठाणे येथील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेत शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनी वर त्यांच्या शाळेतील कर्मचाऱ्याकडून अत्याचाराची घटना घडली सदरील घटना अत्यंत निंदनीय व समाजाला काळीमा फासणारी आहे सदरील घटनेचा आम्ही सर्व नारीशक्तीच्या पदाधिकारी व सदस्य व सर्व नारी जातच तीव्र निषेध करीत आहोत. यावेळी सेजल वनरा व प्रेरणा पाटील या लहान मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ज्या नराधमाने हे कृत्य केलेले आहे त्या व्यक्तीस कडक शासन झालेच पाहिजेत. सदरील खटला हा जलद कोर्टात चालविण्यात यावा ही आमची मागणी आहे.
पिडीत मुलींना न्याय मिळावा तसेच मुलींच्या परिवाराला संरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे. असे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे
यावेळी नारीशक्तीच्या अध्यक्ष मनिषा पाटील, उपाध्यक्ष विद्या जकातदार ,सचिव एडवोकेट सीमा जाधव, कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर, किमया पाटील, मरियम बुगडवाला, हर्षा गुजराती, वंदना मंडावरे, कांचन पाटील ,पूर्वी खंदार व सर्व पदाधिकारी हजर होत्या.


