बदलापूर घटने मधील आरोपीला फाशीची शिक्षा दया – अमळनेर शिवसेना (उबाठा)ची मागणी : तहसीलदार यांना दिले निवेदन ;

अमळनेर – येथील शिवसेना उभाठा पक्षातर्फे बदलापूर येथील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या याबाबत अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की बदलापूर घटनेमधील बलात्कारी नरधामास क्रूर कृत्ये केल्या बाबत फाशीची शिक्षा द्यावी,असे निवेदन अमळनेर शिवसेना उबाठा कार्यकर्ते यांनी बदलापूर येथे झालेला प्रकारा बाबत न्यायालयात जलद गतीने घटना चालवण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.जर त्या नरधमास आज फाशीची शिक्षा नाही झाली तर अश्या
प्रकारचे घटना आपल्या महाराष्ट्रात जास्त घडण्याची शक्यता आहे. सदर
व्यक्तीला शिक्षा न झाल्यास पक्षातर्फे पुढे मोठे आंदोलन करण्यात येईल याची सरस्व जबाबदारी शासनाची असेल याची कृपया नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना देण्यात आले.

याप्रसंगी श्रीकांत पाटील. तालुकाप्रमुख, चंदोखर भावसार .शहर प्रमुख अमळनेर विजय काशिनाथ पाटील,
बाळासाहेब नितीन निळे विजय काशिनाथ पाटील बाळासाहेब पवार माजी नगरसेवक दादा पवार ज्ञानेश्वर पाटील राजेंद्र मराठे तुळशीराम कोळी गोरख पाटील ज्ञानेश्वर गंगाराम पाटील रवी पाटील हिरालाल बिल नितीन पाटील श्रीकांत तालुकाप्रमुख मोहन भोई उमेश अंधारे आदी उपस्थित होते

..