जळगाव : प्रवाश्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने भुसावळातील तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य काही प्रवासी जखमी झाले. रविवार, 18 रोजी संध्याकाळी नशिराबाद पुढे महामार्गावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाजवळ हा अपघात घडला. यशवंत डोके (वय 35,रा. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मोकाट कुत्रा अचानक आडवा आल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
प्रवाश्यांना घेऊन रिक्षा भुसावळकडे महामार्गावरुन जात असताना अपघात झाला. या अपघातात रिक्षातील उषाबाई वारके, शबानाबाई पिंजारी, रिक्षा चालक महेश सातव, मंगलसिंग राजपूत, नरेंद्र मराठे हे प्रवासी जखमी झाले. प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने नशिराबाद पोलिसांनी सर्व जखमीना गोदावरी रुग्णालयात हलविले. पोलिसांनी रुग्ण वाहिकेतून मृत तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला.


