भुसावळ – भुसावळ येथे सीनियर फोटोग्राफर तर्फे वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्यात आला.यावेळी ब्लॅक अँड व्हाईट च्या काळातील फोटोग्राफर नरर्सिंग राठोड यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्दीपज्वलन करून व कॅमेरा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रसंगी नरसिंग राठोड,राजेंद्र जावळे,गोकुळ महाजन,श्याम गोविंदा,गणेश राठोड,छाया राठोड,कल्पना जावळे,ज्योती महाजन,आभा साळी,स्मिता राठोड आदी उपस्थित होते.प्रसंगी नरसिंग राठोड यांनी जुन्या काळातील फोटोग्राफी बाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेंद्र जावळे यांनी तर आभार प्रदर्शन गोकुळ महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धेश राठोड याने प्रयत्न केले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे सीनियर फोटोग्राफरतर्फे वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त कॅमेरा पूजन करताना नरसिंग राठोड सोबत डावीकडून स्मिता राठोड, आभा साळी,कल्पना जावळे,राजेंद्र जावळे,श्याम गोविंदा,छाया राठोड,गोकुळ महाजन,ज्योती महाजन,गणेश राठोड आदी.


