प्रजापिता ब्रह्मकुमारी भुसावळ सेवा केंद्रातर्फे वस्तीगृहात रक्षाबंधन सह वृक्षारोपण संपन्न


भुसावळ – येथील गाडगेबाबा सेवा मंडळ द्वारा संचलित गडकरी नगर येथील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृह येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यामुख्य संचालिका बी के सिंधू दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली बीके ज्योती दीदी कविता दीदी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना राखी बांधली . यावेळी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .

यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .त्यानंतर वस्तीगृहाच्या परिसरात या दिवसाची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बीके अनिल भाई शिंदे भरत भाई मेहता सह तेथील शिक्षक बांधव उपस्थित होते रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता .