जळगांव जिल्हा कॉग्रेंस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे जिल्हा,तालुका, शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत पुढील ठराव सर्वांच्या संमतीने मंजुर करण्यात आले. जळगाव जिल्यातील रावेर (011) या मतदार संघातून काँग्रेस चे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी उमेदवारी मागितलेली आहे तसेच जळगाव शहर मतदार संघातून (013) माजी प्रदेश सचिव ऍड सलीम बापूमिया पटेल यांनी उमेदवारी मागितली आहे.
या दोन्ही नावाची पक्ष श्रेष्ठिकडे शिफारस करण्यात आली .
तसेच जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने लोकसभेच्या निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवारांना निःस्वार्थ भावनेने प्रचंड मतदान केले . त्यामुळे मुस्लिम समाजाची आग्रही विनंती आहे किं जिल्ह्यात किमान एक जागा मुस्लिम उमेदवाराला देण्यात यावी. जळगाव जिल्यातील उर्वरित विधानसभेच्या मतदार संघांमध्ये पक्षातील इच्छुक उमेदवारापैकी कोणाची पक्ष श्रेष्ठिकडे शिफारस करावी यावर चर्चा करण्यात येऊन राज्य व केंद्रीय पक्ष श्रेष्ठिकडे अल्पसंख्यांक विभागातर्फे शिफारस करण्यात येईल.या बैठकीत मागच्या लोकसभेत मुस्लिम समाजाने केलेळले मतदान पाहुन विधानसभेला सुद्धा मुस्लिम समाज पुर्ण ताकतीने महावीकास आघाड़ी चे उमेदवार निवडून निवडून आणणार असे ठरवले .
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान प्रदेश माजी सचिव अँड सलीम पटेल माजी नगर अध्यक्ष दारा मोहम्मद, अल्पसंख्यॉक जिल्हा अध्यक्ष हमीद शेख, जिल्हा सचिव जमील शेख, नगरसेवक आसिफ शेख,ऐड खालीद,कवसर भाई, भुसावळ शहर अध्यक्ष सलीम गवली, तालुका अध्यक्ष अकील अहमद शाह,यावल तालुका अध्यक्ष ईकलाख सैय्यद,शहर अध्यक्ष रहेमान खाटी,महेबुब खान, जामनेर शहर अध्यक्ष मुसा पिजारी,ईसतेयाक जागीरदार,फातमा आपा महीला शहर अध्यक्ष यास्मीन बानो, सलीम खान,जानी गवली,सलीम भाई धरणगाव ईस्माइल तांबोली, अशफाक बोदवड तालुका अध्यक्ष,ररूफ खान, हमीद शेख, डॉ शेख सर अमनेर,सजीद मेहबूब पटेल,सलीम शे हमीद,व जिल्हातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



