पहूर ,

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पहूर येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनजवळ आल्याने गोंदेगाव तांडा येथून पिंपळगाव कमानी येथे पुजा काशिनाथ पवार (वय २१) या माहेरी आई वडीलांकडे होती, काल दि . १६ ऑगस्टच्या रात्री १० वाजेच्या सुमारास विषारी सापाने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला.
त्यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी पुजाबाईस मृत्यू घोषित केले.
गेल्या ३ वर्षांपूर्वी पुजाचे लग्न झाले होते. पुजाला २ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेने पिंपळगाव कमानी गावावर शोककळा पसरली आहे.


