मेजर फायर इन्स्टिट्यूट तर्फे अग्निशमन प्रात्यक्षिक कार्यशाळा उत्साहात ; अग्नीशमन प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेचे आयोजन :

भुसावळ –
राष्ट्रीय छात्रसेना , एनसीसी आणि मेजर इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी भुसावळ यांचे द्वारा
आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी अग्नीशमन आणि सुरक्षा क्षेत्रात नव्याने रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी एनसीसी , राष्ट्रीय छात्रसेंना ,होमगार्ड, तसेच सुशिक्षित बेरोजगार , अग्नीशमन , सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन,एमआयडीसी सुरक्षा अधिकारी या विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी 1 वर्षीय, 2,वर्षीय कोर्स तसेच विविध स्वयंरोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी नरवीरसिंग रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, इन्स्टिटय़ूट ऑफ फायर अँड सेफ्टी चे प्राचार्य संजय खेडकर, व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, नहाटा कॉलेज एनसीसीचे दिपक पाटील श्रीमती स्मिता चौधरी, अर्जुना संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर पंड्या ,आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक सतीश कांबळे, रवीन्द्र पाटील, करणसिंग रावळ, अनिल भिंगाने ,अक्षय राजनकर उपस्थितीत होते, या कार्यशाळेत, विद्यार्थ्यांना, अग्नीशमन करतांना घ्यायची दक्षता, प्रयत्न आगीच्या ठिकाणी अडकल्यास स्वतःला आणि इतरांना कशा पद्धतीने सुरक्षित ठिकाणी हालवावे व आपला व इतरांचा जीव वाचवावा याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.