भुसावळ – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित हिंदवी स्वराज्य दिन पदयात्रा 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेला. मराठा महाविद्यालया जवळील तेच मार्गापासून सुरु होऊन बाजारपेठ पोलीस स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ समारोप झाला आहेत.

याप्रसंगी राष्ट्रगीत वंदे मातरम गायन झाले.देशभक्तीपर पदयात्रे दरम्यान देशभक्तीपर गीत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांचा जयघोष करण्यात आला. या पदयात्रेमध्ये सुमारे 200 युवक युवती सहभागी झालेल्या होत्या. पदयात्रे दरम्यान अग्रस्थानी राष्ट्रीय ध्वज आणि भगवा ध्वज होते. पदयात्रासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या सर्व धारकऱ्यांनी परिश्रम घेतले.


