आईस फॅक्टरीत मोठा स्फोट; अमोनिया वायूमुळे अनेक जण बाधित

पहूर,

जामनेर तालुक्यातील पहूर येथून मोठी बातमी समोर आलीय. येथील एका आईस फॅक्टरीत मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यांना जळगाव आणि पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पहूर येथील आईस फॅक्टरीत अचानक स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याच वेळी मुस्लिम समाजातील मयत झालेल्या महिलेला कब्रस्थान मध्ये ठेवून परतत असतांना या स्फोटमुळे वाकोद रस्त्यावरून जाणाऱ्यांना डोळ्यात अमोनिया गॅस गेल्याने लोकं सैरावैर पळत सुटले. पहूर गावात मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाल्याने यात सरपंच अफजल तडवी, शाकीनाबी सलीम खान पठाण्या यांच्यासह सात जणांची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तर काही जणांवर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.