भुसावळ—
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या काल भुसावळ येथे दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी विविध सांप्रदायांच्या धर्मगुरू, साधुसंतांच्या उपस्थितीत झालेल्या विस्तृत बैठकीत सर्वानुमते दि. १६ ऑगस्ट गुरुवारी रोजी भुसावळ शहर आणि परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येणार असून यासोबत या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ मध्ये य अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथून सकाळी 9.30 वाजता विविध सांप्रदायांच्या धर्मगुरू, साधुसंत यांच्या नेतृत्वात अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड पासून ब्राह्मण संघ मरिमाता मंदीर लक्ष्मी चौक सराफ गल्ली अमर स्टोअर्स बाजारपेठ पोलीस स्टेशन मार्गे गांधी पुतळा ते सरळ जळगाव रोडने प्रभाकर हॉल समोरील प्रांत कार्यालय पर्यंत भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलें आहे . त्या ठिकाणी प्रांत कार्यालयात मोर्चात सहभागी विविध सांप्रदायांच्या धर्मगुरूंच्या संत महंतांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात निषेधाचे निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी भुसावळ शहर आणि परिसरातील उद्योग व्यापार असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती, किराणा दुकानदार संघटना, हॉकर्स असोसिएशन ,रिक्षा युनियन, वाहन चालक मालक संघटना, सराफ दुकानदार असोसिएशन, भाजीपाला मार्केट संघटना, विविध सामाजिक ,धार्मिक अध्यात्मिक सांप्रदाय, महिला युवक संस्था, संघटना, सकल हिंदू समाज बांधव उपस्थित राहणार आहे. तसेच दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी वकील तसेच अत्यावश्यक सेवेतील मेडिकल संघटना काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणार आहेत. भुसावळ आय एम ए असोसिएशन तर्फे शहर आणि परिसरातील विविध दवाखान्यातील बंद राहणार आहे. अत्यावश्यक रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे.

बांगलादेश येथे अनेक हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत . तेथील अल्पसंख्या हिंदू बौद्ध जैन यांच्यावर अमानुष माणुसकीला काळिंबा फासणारे घटना व अ मानवी कृत्य याच्या विरुद्ध एक माणूस म्हणून समस्त सकल हिंदू समाजाने भुसावळ शहर आणि परिसरात कडकडीत बंद पाडून या निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येने , केंद्र सरकारने बांगलादेश येथील हिंदूंना संरक्षण देण्याबाबत भूमिका जाहीर करावी. याबाबत केंद्र सरकारने मानवाधिकार संघटनेने भूमिका मांडावी. यासाठी हे निवेदन देणार असल्याचं सकल हिंदू समाजातर्फे कळविण्यात आलेला आहे. व या निषेध मोर्चा तर्फे समस्त सकल हिंदू समाजाने उपस्थित राहण्याच आवाहन देखील करण्यात आलेल आहे.


