भुसावळ (प्रतिनिधी) – प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री दशमाँ मातेची स्थापना शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील तेली गल्ली येथील अजय गजमल चौधरी यांचे निवासस्थानी आषाढ शुद्ध दिप अमावस्येला दशमातेची स्थापना करण्यात आली . स्व विजय ( उर्फ छोटू ) व स्व अमोल (आबा )गजमल चौधरी या बंधूनी या देवीची स्थापना केली होती आपल्या भावाला पुत्ररत्न प्राप्तीसाठी त्यांनी नवस केला व देवी नवसाला पावली मात्र केवळ 5 वर्षच पुजार्चना करून त्यांनी नवसपूर्ती केली व पुढेही देवीची सेवा अविरतपणे सुरू ठेवली त्यांच्या पश्चात अजय , उदय गजमल चौधरी व सनी चौधरी यांनी ही धुरा सांभाळली आहे . गुजरात मिनावाडा येथील या गावापासून उदयास आलेल्या या दशमातेवर गुजरातसह महाराष्टात भक्तांची श्रद्धा आहे भुसावळ शहरात सुद्धा देवीचे भक्त असून नवसाला पावणारी सुख शांती देणारी ही दशमाता आहे . ही देवी कुमारिका आहे 10 दिवशीय या सोहळ्यात देवीला विविध मिष्टान्नचा नैवद्य दिला जातो .सकाळ संध्याकाळ आरती व कथा वाचन होते .यानिमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात यात भजन , संगीत , गरबा यांचा समावेश असतो . तापी नदीतीरावर रात्री 12 वाजेनंतर सुर्योदयाचे आत दहा दिवसांनी देवीचे विसर्जन केले जाते. दरम्यान देवीचा भंडारा महाप्रसादाचे आयोजन केले जाते . यंदा आयोजित या सोहळ्याचे निमित्त शनिवार दिनांक १०/०८/२०२४ रोजी भंडारा ( महाप्रसाद / भोजन )चे आयोजन स्थानिक विठ्ठल मंदिर वार्ड येथे दुपारी १२ ते २ दरम्यान करण्यात आले आहे तरी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अजय चौधरी (मुन्ना भाऊ) उदय चौधरी (पप्पू भाऊ),ऋषभ चौधरी (सनी)
व समस्त चौधरी परिवार यांनी केले आहे



