लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि रक्सौल दरम्यान १४ विशेष गाड्या धावणार :

रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते रक्सौल दरम्यान १४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-रक्सौल विशेष (१४ सेवा)

05586 विशेष दि. ११.०८.२०२४ ते दि. ०१.०९.२०२४ या कालावधीत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १६.३५ वाजता सुटेल आणि रक्सौल येथे तिसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)

05585 विशेष दि. ०९.०८.२०२४ ते दि. ३०.०८.२०२४ या कालावधीत दर शुक्रवारी रक्सौल येथून १६.५५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

थांबे: कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्झापुर, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुजफ्फरपुर, सीतामढ़ी आणि बैरगनियां.

संरचना: १४ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १० सामान्य द्वितीय श्रेणी. (२४ डब्बे)

05558 विशेष गाडी दि. १५.०८.२०२४ ते दि. २९.०८.२०२४ या कालावधीत गुरुवारी सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०७.५५ वाजता सुटेल आणि आणि रक्सौल येथे दुसऱ्या दिवशी १६.५० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

05557 विशेष दि. १३.०८.२०२४ ते दि. २७.०८.२०२४ या कालावधीत दर मंगळवारी रक्सौल येथून १९.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

थांबे: कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय, पाटणा, बरौनी, समस्तीपुर, दरभंगा, कमतौल, जनकपुर रोड, सीतामढ़ी आणि बैरगनियां.

संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ३ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान, ४ शयनयानचे अनारक्षित डबे, १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२२ डब्बे)

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 05586 आणि 05558 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १०.८.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.