भुसावळ – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. यादव यांनी ०९.०८.२०२४ रोजी भुसावळ विभागातील भुसावळ येथे पाहणी केली.
महाव्यवस्थापकांनी स्थानकाच्या पाहणीदरम्यान आणि कार्याचा आढावा घेतला.
महाव्यवस्थापकांनी विभागीय रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे नवीनीकृत बनविण्यात आलेले अधिकारी वॉर्ड आणि हिंदी वाचनालय चे उदघाटन करण्यात आले. रेल्वे हॉस्पिटल परिसरात तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.
महाव्यवस्थापकांनी कार्मिक विभागाद्वारे वैकल्पिक नियुक्ती संबंधी अँप लाँच करण्यात आले. हि अँप द्वारे मेडिकल डी कॅटेगरी कर्मचारी साठी असेल.
भुसावळ कृष्णचंद्र सभागृह येथे संरक्षा सेमिनारचे आयोजन संरक्षा विभागाद्वारे करण्यात आले. या सेमिनार चे उदघाटन महाव्यवस्थापकांनी केले. या सेमिनार मध्ये अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या असामान्य घटना टाळण्यासाठी विहित केलेल्या सुरक्षित कार्यान्वयन आणि देखभाल पद्धतींची खातरजमा करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कामकाजाच्या पद्धतींचा सखोल आढावा घेण्याच्या सूचना या सेमिनार देण्यात आल्या. यामध्ये विविध विभागातील डेपो मधून कर्मचारींनी समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य पद्धतींविषयी चर्चा आणि उपाय सुचवण्यात आलेत. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आणि आपले काम सावधगिरीने आणि सतर्कतेने करा असा सल्ला देण्यात आला. तसेच कामादरम्यान शॉर्टकट पद्धतीचा अवलंब न करणे आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याबाबत कर्मचाऱ्यांना समुपदेशन करण्यात आले.
रेल्वे स्कूल भुसावळ च्या विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महाप्रबंधकांनी रेल्वे स्कूल भुसावळ व कार्मिक विभागाला २५ हजार रुपये आणि संरक्षा सेमिनार साठी २५ हजार रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले.
भुसावळ येथील ताप्ती क्लब मध्ये नवीनीकृत बनविण्यात आलेले सभागृह चे उदघाटन महाव्यवस्थापकांनी केले.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम के मीना ,तसेच सर्व शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



