जळगाव तालुक्यातील वावडदा येथे डंपर-लक्झरीची समोरासमोर धडक :३ गंभीर,१३ जखमी


जळगाव : तालुक्यातील पाचोरा रोडवरील वावडदा गावाजवळ वळणावर लक्झरी बस व डंपर यांचा समोरासोर धडक दिल्याने जोरदार भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली . या अपघातात लक्झरीतील जवळपास १६ प्रवाशी जखमी झाल्याचे समोर आले आहे. यात पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील १४ जण आहेत. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले होते. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते. पाचोरा ते जळगाव अशी प्रवाशी ने आण करणारी लक्झरी एमएच १९ वाय ३३५९ ही गुरूवारी दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता पाचोरा येथून प्रवाशी भरून जळगावच्या दिशेने जात होती.

केसीएन याचवेळी वावडदा गावाच्या वळणावर समोरून पाचोरा दिशेने येणाऱ्या भरधाव येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत डंपर चालकासह लक्झरीमधील एकूण १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात लक्झरी बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघात घडल्यानंतर वावडदा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरू केले रूग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यात डंपरचालक संजय पुंडलिक महाजन (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा) यांचेसह सिंधूबाई एकनाथ पाटील (वय ५०), सरूबाई विठ्ठल केळकर (वय ५५) याना दवाखान्यात त्वरित उपचारार्थ दाखल करण्यात आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.

या अपघातामध्ये इंदुबाई बिरबल राठोड (वय ४०), बिरबल हरसिंग राठोड (वय ५०), करण बिरबल राठोड (वय १८, सर्व रा. नांद्रा ता. पाचोरा), सुवर्णा भूषण पाटील (वय २८, नांद्रा ता. पाचोरा), श्रीकृष्णा हरी माळी (वय ५२), अंजना श्रीकृष्ण माळी (वय ४५,दोन्ही कुऱ्हाड ता. पाचोरा), प्रवीण सुरेश पाटील (वय ३५, रा. नांद्रा ता. पाचोरा), मनीषा विनोद पाटील (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा), (केसीएन)रंजना पुना पाटील (वय ४५, रा. रा. नांद्रा ता. पाचोरा), पूजा कैलास पवार (वय ३८, रा. रा. नांद्रा ता. पाचोरा), सुरेखा नरेंद्र पाटील (वय ३८, रा. नांद्रा ता. पाचोरा), आशा अशोक पाटील (वय ४०,रा. नांद्रा ता. पाचोरा), आबा वसंत पाटील (वय ५०,रा. नांद्रा ता. पाचोरा) हे जखखी झाले आहे