भुसावळ शहरातील रेशनवर ऑफ लाईन धान्य वितरण करा – उबाठा शिवसेनेची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन :

भुसावळ – भुसावळ शहरातील रेशनदुकांना मधून उद्या पासून शासन जी आर नुसार ऑफ लाईन धान्य वितरण करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शेवसेनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत आज गुरुवार दिनांक 1 रोजी तहसीलदार नीता लबडे यांना निवेदन देण्यात आले आहे . उद्या पासून ऑफ लाईन धान्य वितरण करण्यात यावे व रेशन दुकानदाराला पण त्यांचे होणारे कमिशन तत्काळ त्यांच्या बँकेत जमा करावे अन्यथा , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भुसावळच्यावतीने आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे .

शहरातील रेशन दुकानात धान्य जुलै महिन्याच्या धान्य उपलब्ध झालेले आहे नियमानुसार उपलब्ध धान्य हे त्याचं महिन्यात वितरण करणे आवश्यक असते परंतु ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्याने गेल्या काही दिवसांपासून गरीब लोकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.त्या मुळे वंचित लाभार्थी रोज आपला रोजगार बुडवून धान्य दुकानाच्या चकरा मारत आहे त्या मुळे त्यांचा रोजगार ही बुडतो व त्यांना धान्य ही मिळत नाही आणि त्यामुळे रेशन दुकानदारांशी त्यांचे वाद सुध्धा होतात , बाजारात हा रेशन माल महाग असल्यामुळे ते खरेदी करू शकत नाही. तसेच सध्या सणासुदीचे दिवस येत आहेत. अशा परिस्थितीत रेशन न मिळाल्यास या गरीब कुटुंबातील लोकांचे हाल होत आहेत. रेशन असूनही निव्वळ तांत्रिक अडचणी मुळे लोकांना धान्य वितरण होत नाही. दुकानदार धान्य वितरण करीत नाही.
आता शासनाने निर्णय घेतला आहे कि, ऑनलाईन यंत्रणा सक्रिय होत नाही तोपर्यंत शिधा पत्रिका धारकांना ऑफ लाईन धान्य वितरण करावे.असे महाराष्ट्र शासनाचे आदेश आलेले आहेत,यावर आजच निर्णय धेऊन उद्या पासून ऑफ लाईन धान्य वितरण करण्यात यावे व रेशन दुकानदाराला पण त्यांचे होणारे कमिशन तत्काळ त्यांच्या बँकेत जमा करावे ,
अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भुसावळच्या वतीने आंदोलन केले जाईल
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,दिलीप सुरवाडे,बबलू बारहाते,पिंटू भोई,रहीम कुरेशी,शरद जैस्वाल,बबलू धनगर,रिंकू भोई,विनोद गायकवाड,राकेश खरारे,आदी शिवसैनिक उपस्थित होते