विष्णापूर येथे ११ लाखांचा गांजा पोलिसांनी केला जप्त -चोपडा तालुक्यात अडावद पोलीस स्टेशनची कारवाई


चोपडा : येथून जवळील विष्णापूर येथील एका पत्रीशेडच्या घरावर शनिवारी दि. २७ रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा अडावद पोलीस स्टेशनने जप्त केला आहे. दुचाकीसह एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

विष्णापूर येथील सायसिंग बरकत बारेला (वय ३६) हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडमध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने शनिवारी दि. २७ रोजी पहाटेच्या सुमारास चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डाॅ.कुणाल सोनवणे, पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे स.पो.नि. संतोष चव्हाण, पो.उ.नि. राजु थोरात, पो.हे.काॅ. भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, संजय धनगर, सतिष भोई, भूषण चव्हाण, जयसिंग राजपूत, मधुकर पवार यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. तसेच ६ हजार रुपये किंमतीचा ईलेक्ट्राँनिक वजन काटा, एक लाख रुपये किंमतीची मोटार सायकल यासह सायसिंग बारेला यास अटक केली आहे. पुढील तपास पो.हे.काँ. अनवर तडवी करीत आहे.