भुसावळातील वाहतुकीला शिस्त लावणार – नूतन सहा.निरीक्षक उमेश महाले :

भुसावळ : भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले हे रुजू झाले आहेत. नुकताच त्यांनी पदभार स्विकारला. प्रसंगी वाहतूक शाखेतील सहकारी कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.

शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यात येईल तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडचण निर्माण करणार्‍या वाहनांवर तसेच बसस्थानकाबाहेरून अवैधरित्या वाहतूक करणार्‍या वाहनांवर सुद्धा कारवाई करू, असेही महाले यावेळी म्हणाले.