मंडल रेल प्रबंधकांनी लासलगांव ते इगतपुरी खंडाची तपासणी :


भुसावळ – मंडल रेल प्रबंधकांनी लासलगांव ते इगतपुरी खंडाची तपासणी केली

मंडल रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांनी दिनांक २६.०७.२०२४ रोजी भुसावळ ते इगतपुरी खंडाचे विंडो ट्रेलिंग द्वारे स्टेशन्सचे निरीक्षण केले. विंडो ट्रेलिंग निरीक्षणा दरम्यान गाडी संचालनाशी संबंधित सर्व संरक्षा मानकांचे, स्टेशन स्वच्छता, ट्रॅक, पूल आणि ओएचईचे अवलोकन केले.

मंडल रेल प्रबंधकांनी लासलगांव आणि देवळाली स्टेशनवर अमृत भारत योजने अंतर्गत सुरु असलेले कार्याचा सखोल निरीक्षण केले. स्टेशन निरीक्षणाच्या वेळी त्यांनी स्टेशनवर चालू असलेल्या कामांची पाहणी केली. सध्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची देखील त्यांनी समीक्षा केली आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश दिले. लासलगांव स्टेशन येथे कॅन्टीन स्टॉल , एक स्टेशन एक उत्पाद स्टॉल चे निरीक्षण करण्यात आले. देवळाली स्टेशन येथे स्टेशन, प्लॅटफॉर्म, स्टेशन परिसर येथे निरीक्षण करण्यात आले. तसेच नासिक रोड येथे माल गोदाम येथे निरीक्षण केले.

या निरीक्षणादरम्यान संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.