जळगाव येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.
दि १५ जुलै ते १८ जुलै दरम्यान जळगांव येथे जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा सुरु होत्या यात १६ वर्षातील मुलांच्या गटात अंतिम फायनल सामना गोदावरी स्कुल व ताप्ती पब्लिक स्कुल भुसावळ यात खेळला गेला,अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ताप्ती पब्लिक स्कुलच्या संघाने १-० ने विजय मिळविला. Girlfriend सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान ताप्ती पब्लिक स्कूलचा रॉयल रॉस याला मिळाला असून त्यास भुसावळचे अमीन शेख यांनी किट देऊन त्याचा गौरव केला.
तर मुलींच्या १६ वर्ष वयोगटातील अंतीम फायनल सामन्यात भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कुल विरुद्ध जळगांव येथिल रुस्तुमजी स्कुल यात खेळण्यात आला. यात ताप्ती पब्लीक स्कुलच्या मुलींच्या संघाने १/० ने रुस्तुमजी स्कुल ला हरवून हा सामना आपल्या नावावर केला.
भुसावळ फुटबॉल युनायटेट क्लब चे मॅनेजर अमिन शेख यांनी उत्कृष्ट प्लीयर आर्या वाघ हिला सन्मानीत केले.
या मुलांच्या फुटबॉल सामन्यात जिल्ह्यातील २६ शाळांचा समावेश तर मुलींच्या सामन्यामध्ये ११ शाळांचा समावेश होता.
या सर्व विजयी विद्यार्थ्यांना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णू चौधरी,कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा,प्रिन्सिपल निना कटलर यांनी शाळेत कौतुक करुण सन्मानीत केले,तर या विद्यार्थ्यांना ताप्ती पब्लीक स्कुल चे हेड कोच अर्जुन सनस व असिसटंट कोच आकाश परदेशी,अकबर खान,डॅनियल पवार,विजय सकट यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो – विजयी संघासोबत प्रिंसीपल नीना कटलर, हेड कोच अर्जुन सणस,आकाश परदेशी आदी.


