भुसावळ – आषाढी एकादशी निमित्त येथील सांस्कृतिक कलानिकेतनतर्फे ” टाळ नृत्याचा” हा अनोखा नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सप्तशृंगी माता मंदिर तापी नगर भुसावळ येथे दिनांक १७ जुलै रोजी सादर करण्यात आला .

या टाळ नृत्यासाठी शहरातील विविध भागातील विविध क्षेत्रातील महिला यात गृहिणी ,शिक्षिका , यासह नोकरी करणाऱ्या असा किमान 75 जणांचा सहभाग या कार्यक्रमात होता. कार्यक्रमाची सुरुवात आमदार संजय सावकारे , सौ रजनी सावकारे यांचे हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूजन नटराज पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समन्वयक सौ आरती चौधरी डॉ .सौ सुवर्णा गाडेकर , मुकेश खपली , सुचेता खपली ,. प्रमोद नेमाडे , प्रा डॉ सुनील नेवे व सौ विनिता नेवे, डॉ वंदना वाकचौरे , डॉक्टर जे के भिरुड , डॉक्टर निलेश भिरूड ,भंगाळे सर . जगदीश पाटील सर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुकेश खपली यांनी केले.
गेल्या महिन्याभरापासून सांस्कृतिक कलानिकेतन प्रमुख मुकेश खपली यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा सराव सुरू होता. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी या गाण्याने सुरू झालेले नृत्याची माऊली माऊली या गाण्यार सांगता झाली . सांस्कृतिक कलानिकेतनच्या माध्यमातून सुमारे 50 ते 55 स्त्रियांच्या एकसंध हालचाली व सुंदर पदन्यास सोबत सुंदर एकसुरात वाजणारे टाळ यांनी उपस्थितांची दाद मिळवली यावेळी प्रत्यक्ष पंढरीच्या वारीत सहभागी असल्याची जाणीव झाल्याने सर्व प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध होऊन गेला.
टाळ मृदुगाच्या गजरात लयबद्ध ठेक्यावर श्री विठ्ठलाच्या गजरात सर्वाना एका वेगळ्याच विश्वात टाळकरी आम्हास घेऊन गेले. प्रत्यक्ष पंढरीची वारी घडल्याचे वाटत होते असे समन्वयक सौ आरती चौधरी यांनी कार्यक्रम प्रस्तुती विषयी कौतुकास्पद गौरव उद्गार काढले. सांस्कृतिक कलानिकेतन विषयी असलेली आत्मीयता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. तर प्रा डॉ सुनील नेवे सर यांनी सुद्धा या सादरीकरणाची प्रशंसा करून प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन घडल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आज खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फिटले असेही नेवे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे निवेदन सौ मनीषा ताडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ शालिनी वाडेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री व सौ भाग्यश्री भंगाळे. शंभू गोडबोले मधु गोडबोले सुनील पाटील यश इंगळे. रवि वाघ. प्रियंका चौधरी शालिनी वाडेकर अश्विनी पाटील राहुल पाटील सुचिता खपली , अभिमन्यू टेमकर , अर्चना चौधरी , यशश्री चौधरी, स्वाती गाजरे सौ मनीषा ताडेकर यांनी प्रयत्न केले.
.





