भुसावळ : निफाड स्टेशनवर डाऊन लूप लाईन तसेच अप लूप लाईन आणि अप गुड्स शेड लाईनचा लांबीचा विस्तार करण्यात करण्यात येत असल्याने मंगळवार, 16 रोजी भुसावळ-ईगतपुरी व भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

उद्या या गाड्या रद्द
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 16 रोजी गाडी क्रमांक 11119 ईगतपुरी-भुसावळ मेमू व गाडी क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू तसेच गाडी क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस व गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली रद्द करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रवाशांना केले आहे.


