भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याचे वतीने भवानी मंदीर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच यावेळी एकलव्य चौकातील भिल्ल वस्तीतील महिलांना एक झाड आईच्या नावाने या योजनेखाली वेगवेगळ्या झाडांची रोपे दिली.
याप्रसंगी उपस्थित महिला पुरुषांना देवगिरी कल्याण आश्रमाच्या जिल्हा महिला सहप्रमुख ॲड जास्वंदी भंडारी यांनी कल्याण आश्रमाच्या माध्यमातुन होणार्या कामाची माहिती दिली ॲड मंजुषा कुलकर्णी, प्रतिमा अग्रवाल यांनी महिलांशी संवाद साधुन महिलांची समिती तयार केली अनिताई ठाकरे व ॲड. रेखा सपकाळे यांनी वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करुन त्याठिकाणी खड्डे खोदुन घेतले ॲड. जयश्री देशमुख,स्वाती भोळे संगिता काटदरे,विजया निकम यांनी वृक्ष लागवडीचे महत्व ,फायदे व संवर्धन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले . यासाठी भिल्ल वस्तीतील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले





