आषाढी एकादशीनिमित्त हाेणार प्रसाद वाटप

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.१७ राेजी आषाढी एकादशिनिमित्त विठु नामाचा गजर करित प्रसाद वाटपाचे आयाेजन करण्यात आले आहे.
दरम्यान १७ रोजी प्रारंभी श्रीं ची तसेच श्री विठ्ठल रूक्मीणी मातेची पूजा स.५:३०. ते ७:३० हाेईल. तरी या सोहळ्यास भाविकांनी उपस्थिती द्यावी. असे आवाहन संस्थांनतर्फे करण्यात आले आहे .

दरम्यान ज्या भाविकांना प्रसादासाठी केळी, साबुदाणा, राजगिरा लाडू, शेंगदाणे किंवा तेल अथवा देणगी रोख रक्कम द्यावयाची असल्यास त्यांनी जामनेर राेडवरील गजानन महाराज देवस्थान पदाधिका-यांशी दि.१६ व १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.