खिरोदा
शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील सर्व सुविधा उपलब्ध आहे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागते पाठ्यक्रमातील विविध प्रयोग हे प्रत्येक वेळी प्रयोग शाळेत करता येणे शक्य नसते यामुळे विद्यार्थ्यांच्या अमूर्त संकल्पना मूर्त होत नाही यासाठीच खिरोदा येथे कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून याचा उपयोग परिसरातील विद्यार्थ्यांना होणार असल्याचे प्रतिपादन आ. शिरीष चौधरी यांनी केले
रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडिया व जनता शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खिरोदा येथे कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन प्लॅनेटोरियम सोसायटीचे अध्यक्ष जे जे रावल, इस्रोच्या वैज्ञानिक डॉ. माधवी ठाकरे, मॅथ गुरु ऑफ इंडिया बी एन राव, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबचे सेक्रेटरी राजेश ठाकूर, मुंबईतील होमी भाभा सायन्स सेंटर चे सायंटिफिक ऑफिसर विनोद सोनवणे, रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी, आईसर पुणे येथील रजिया शेख, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स सायंटिस्ट नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चेअरमन सुनील वानखेडे, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनाजी नाना माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भारती बढे यांनी सायन्स सेंटर चे महत्व सांगितले यावेळी बोलताना डॉ. माधवी ठाकरे यांनी सांगितले की भविष्यात संशोधन खूप महत्त्वाचे आहे या संशोधन विषयीची माहिती विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे यामुळेच आज भारताने चंद्रावरती दक्षिण ध्रुवावरती यशस्वी लँडिंग केले आणि भारत हा प्रथम देश ठरला तर जे जे रावल बोलताना म्हणले की ब्रम्हांडात अनेक घटना घडत आहे याचा अभ्यास करण्यासाठी गणित विषय पक्का असला पाहिजे गणिताशिवाय विज्ञान अपूर्ण आहे तर मॅथ गुरु बी एन राव यांनी चालता बोलता गणित कसे करावे गणितावर प्रेम कसे केले पाहिजे यासह गणिताविषयी आकर्षण निर्माण करणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी करून घेतल्या तर राजेश ठाकूर यांनी वर्षभरामध्ये प्रत्येक दिवसाला गणिताचा विशेष दिन आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे
यानंतर मान्यवरांच्या हस्ते कलाम सायंटिस्ट सेंटरचे कार्यालय सायन्स लॅब मॅथेमॅटिक्स लॅब व स्पेस चे उद्घाटन करण्यात आले या सेंटरमध्ये प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांसाठी विविध ऍक्टिव्हिटी राबविण्यात येणार आहे याचा लाभ विद्यार्थिनी यावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले

दुसऱ्या सत्रात परिसरातील निवडक शंभर विद्यार्थ्यांसाठी ऍक्टिव्हिटी करण्यात आल्या यामध्ये गणितातील टुडी शेप असलेल्या आकृत्या थ्रीडी शेप मध्ये तयार करून त्याची बाजू कडा शिरोबिंदू पृष्ठभाग याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली हँड्स ऑन सायन्स च्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या


