माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑनलाईन रेशन कार्ड अट शिथिल करा – शिशिर जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भुसावळ – महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात नुकतीच सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत. राज्यातील 21 ते 65वयोगटातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू करून
एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सर्व महिलांना यामुळे आधार देण्याचा प्रयत्न सरकार कडून करण्यात आलेला आहे..
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील अडीच लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या केशरी ,पिवळे रेशन कार्ड धारक महिलांना महिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत. यासाठी आपल्या सरकारकडून सदर योजनेसाठी विविध कागदपत्रांच्या अटी घालण्यात आलेल्या आहे. ज्यात सदर योजनेसाठी पात्र महिलांना रेशन कार्ड सुद्धा अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यात रेशन कार्ड ऑनलाइन असेल अशांचीच या योजनेसाठी नोंदणी होत आहे. मात्र राज्यातील बरेच केशरी रेशन कार्ड धारक यांचे कडे बारा अंकी नंबर नसल्यामुळे त्यांचे रेशन कार्ड ऑनलाइन झालेले नाहीयेत. ऑनलाइन रेशन कार्ड करण्यासाठी प्रक्रियेला कमीत कमी 25 ते 30 दिवस अवधी लागतो . त्यातल्या त्यात तहसील कार्यालयांमध्ये सदर ऑनलाईन रेशन कार्ड करण्यासाठी तीन ते चार महिने सुद्धा लावले जातात. रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी बारा अंकी नंबर घेऊन यासाठी नागरिकांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बरेच रेशन कार्ड धारक रेशन कार्ड ऑनलाइन करण्या बाबत उदासीन असतात.त्यामुळे ऑनलाईन रेशन कार्ड नसलेल्या केशरी कार्ड धारक महिला भगिनीं सदर योजने पासून वंचित राहतील हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाला सारखं होईल. सदर योजनेचा लाभ ऑनलाइन नसलेल्या केशरी कार्ड धारक महिलांना सुद्धा मिळाला पाहिजे .
म्हणून सदर योजनेसाठी रेशन कार्ड ऑनलाईन असण्याची अट त्वरीत शिथिल करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून विनंती केली असल्याचं त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविलेले आहे .