पक्षांचा नैसर्गिक अधिवास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य -पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांचे मत ;

भुसावळ – नेहरू विद्यामंदिर तळवेल येथे ‘चातक नेचर कंझर्वेशन सोसायटी, वरणगाव ‘चे अध्यक्ष अनिल एस .महाजन( पक्षी तज्ञ) यांनी भेट दिली असता, त्यांनी पक्षी विविधतेवर आधारित स्लाईड शोचे सादरीकरण केले.

यावेळी पक्षांचा नैसर्गिक अधिवास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असेत मत व्यक्त केले . यातून मुलांना ‘ पक्ष्यांच्या पर्यावरणातील भूमिकेचे महत्त्व ‘,’त्यातील त्यांचे जैवविविधतेतील स्थान’ याविषयी सखोल व मनोरंजक माहिती दिली. तसेच मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस .अहिरे सर होते सूत्रसंचलन .अरुण फेगडे यांनी तर आभार . एम. एन. इधे यांनी केले.