भुसावळ विभागीय कार्यालयात ग्रामविकास मंत्री यांचेसह लोकप्रतिनिधींची रेल्वे प्रबंधक यांचेशी विविध विषयावर चर्चा :

भुसावळ – दि. 23.06.24 रोजी, भुसावळ विभागीय कार्यालयात गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, सौ. स्मिताताई वाघ, खासदार जळगाव, संजय सावकार, आमदार भुसावळ,. राजूमामा भोळे, आमदार जळगाव शहर, मंगेश चव्हाण आमदार चाळीसगाव, चंद्रकांत पाटील, आमदार मुक्ताईनगर यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता समन्वय तरुण कुमार यांच्याशी विभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यात प्रामुख्याने पुढील विषयावर चर्चा केली भुसावळ बसस्थानक समोरील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याबाबत. , छत्रपती शाहू महाराज-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आणि देवळाली-भुसावळ मेमूच्या वेळेत बदल करणे. ट्रेन क्रमांक 17063/64 मनमाड- सिकंदराबाद- मनमाड अजंता एक्स्प्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार. , भुसावळ कॉर्ड लाईन येथून जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा.पाचोरा-जामनेर-नवीन ब्रॉडगेज लाईन आणि त्यासाठी भूसंपादन यावर चर्चा. पुलाखालील रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या. भुसावळ येथे गती शक्ती कार्गो टर्मिनल आणि सावदा माल गोदामात कव्हर शेडची व्यवस्था करावी.या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.