भुसावळ – डी एस देशमुख हायस्कूल थोरगव्हाण ता. रावेर येथे नुकताच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवसाच्या पार्श्वभूमी वर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागांतर्गत असणाऱ्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या जळगाव जिल्ह्याचे नशाबंदी संघटक प्रा डॉ दयाघन एस राणे हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी श्री चंद्रकांत चौधरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून डी एस देशमुख हायस्कूल थोरगव्हाण चे मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव हे उपस्थित होते.
आपल्या मुख्य मार्गदर्शन सत्राच्या भाषणात प्रा डॉ दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांना विविध अमली पदार्थांचा मानवी शरीरावर कसा घातक परिणाम होतो हे सांगून आपण आपल्या कुटुंबातील व्यसन करणाऱ्या सदस्यांना व्यासा सोडण्याचा आग्रह केला पाहिजे असे आवाहन केले. त्याच प्रमाणे आपण आपले लक्ष निर्धारित करून अभ्यास करावा, वाईट संगतीत राहू नये असे सांगत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. मुख्याध्यापक श्री वैष्णव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की तुमच्या परिसरात तंबाखू सिगारेट च्या टपऱ्या असतात. आपण त्या वर येणाऱ्या आणि तंबाखू गुटखा सेवन करणाऱ्या तरुणाचे अनुकरण करू नये. त्या मुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की तुम्ही विद्यालयात येतात ते जीवनोपयोगी शिक्षण घ्यायला. पण टपरी आणि दारू च्या दुकानांची शाळा वेगळी असते. संस्कारक्षम असणाऱ्या लहान मुलांना ते आपल्याकडे आकर्षित करतात कारण लहान वयात व्यसन लागले म्हणजे ते कायम साठी टिकते. तेव्हा विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या शले कडे न वळता जीवनाच्या शाळेत येवून आपले शिक्षक वर्ग जे जीवनोपयोगी शिकवतात ते शिकून आपले जीवन सुशिक्षित आणि सुसंस्कारित बनवावे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे पर्यवेक्षक श्री चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती ची शपथ दिली. कार्यक्रम प्रसंगी सुमारे साडे तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे ठिकाणी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी निर्मिती केलेले पोस्टर प्रदर्शन आणि अमली पदार्थ, त्यांचे दुष्परिणाम आणि व्यसनांबद्दल माहिती असणारे फ्लेक्स बॅनर्स विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी लावण्यात आले होते. त्याचा विद्यार्थी आणि शिक्षकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे शिक्षक श्री युवराज कुरकुरे यांनी केले.






