भुसावळात जागतिक योग दिन उत्सव : महिला सबलीकरण व सशक्तीकरणासाठी योगा

भुसावळ – महिला सबलीकरण व सशक्तीकरणासाठी योगा
(आयुष मंत्रालयाकडून घोषित झालेली या वर्षीची जागतिक योगदिनाची थीम) हा कार्यक्रम महीला व पुरूष सर्वांसाठी खुला असून दिनांक 21 जून 2024 रोजी
सायंकाळी 5.30 ते 7 वाजता येथील लोणारी मॅरेज हॉल, जळगाव रोड, येथे आयोजित करण्यात आला आहे .
यावेळी प्रमुख अतिथी नामदार श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री)
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे उपस्थित राहणार आहे . योग उत्सवात
सायंकाळी 5.30 वाजता योगा सेशन , सामूहिक शंखध्वनी ,
मान्यवर अतिथींचा सत्कार , यासह अध्यक्षीय भाषण व समारोप असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे तरी सर्व योग प्रेमी महिला व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन
आयोजक भाजप योग प्रकोष्ठ जळगाव पूर्वदि आर्ट ऑफ लिव्हींग भुसावळ प्रतिष्ठा महिला मंडळ .लेवा स्त्री जागर भुसावळ ,व अद्वैतानंद योगा फिटनेस स्टुडिओ यांनी केले आहे . योगासाठी येताना आपली स्वतःची योगा मॅट किंवा सतरंजी, पाण्याची बॉटल सोबत आणावी आणि सैल कपडे घालून यावे. अधिक माहीतीसाठी संपर्क:
प्रा. डाॅ सीमा देवेन्द्र 7756042375 कुणाल महाजन सर
9823899377 यावर संपर्क साधावा .