सर्व शाखीय ब्राम्हण समाजातील गुणवंतांचा 30 रोजी सत्कार


भुसावळ । प्रतिनिधी – येथील श्री शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळाच्या वतीने सर्व शाखीय ब्राम्हण समाजातील इयत्ता दहावीपासुन ते उच्च शिक्षण (अंतिम वर्षाचा निकाल) (सर्व फॅक्ल्टी) (वार्षिक व अंतिम वर्ष 2023-2024) विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ रविवार, दि. 30 जून 2024 रोजी आयोजित केलेला आहे.
या सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व गुणगौरव प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या करिता गुणवंत विद्यार्थ्यांनी दि.24 जून पर्यंत आपल्या गुणपत्रकाची सत्यप्रत अध्यक्षांकडे जमा करावी. तसेच मोबाईल नंबरसह सर्व माहिती अचुक भरावी. माहितीमध्ये नोंदविलेल्या माहितीनुसारच पाल्याचे प्रशस्तिपत्र मिळेल. तसेच दि. 25 जून पर्यंतच ही माहिती जमा करावी यानंतर आलेल्या माहितीस प्रशस्तिपत्र मिळणार नाही. यासंबंधिची अधिक माहितीसाठी तसेच गुणपत्रक सत्यप्रत जमा करणेसाठी अध्यक्ष गजानन पु. जोशी (9373420442), सहसचिव सौ. चित्रा प्रसाद आचार्य (9422778034), सहसचिव सुनिल पाठक (9096724020), कोषाध्यक्ष अनिल विश्वनाथ हिंगवे (9850177434) यांच्याशी संपर्क साधावा, तरी सर्व शाखीय ब्राम्हण समाजातील जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या पलाकांनी आपल्या पाल्याचे गुणपत्रक जमा करावे, असे आवाहन श्री शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष व सर्व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.