संसारात राहात असतांना सुध्दा अनासक्त राहण्याचा प्रयत्न करावा : आचार्य महाश्रमण महाराज –


भुसावळ : संसारात असतांना सुध्दा माणसाने अनासक्त रहायला शिकावे, मोह, माया, लोभ, मत्सर, द्वेष सोडावा, यातून सुध्दा आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. यासाठी अनासक्त राहून पहावे, असे प्रतिपादन आचार्य महाश्रमण महाराज यांनी येथे केले. शहरातील संतोषी माता हॉलमध्ये शनिवारी आयोजीत प्रवचनात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेने वेधले लक्ष
शनिवारी सकाळी आठ वाजता आचार्य महाश्रमण महराज यांचे कुर्‍हेपानाचे येथून जामनेर रोडवरील बियाणी पब्लिक स्कूलजवळ आले. तेथून त्यांची शोभायात्रा सकाळी आठ वाजता काढण्यात आली होती. ही शोभायात्रा 9 वाजता तेरापंथ भवनात दाखल झाली. जामनेर रोडने आलेल्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. शहरासह परिसरातील गावामधून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थिती होते.