भुसावळ : शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर वाद होऊन एकाच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून दुखापत करण्यात आली. ही घटना शुक्रवार, रोजी घडली. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर शुक्रवार १४ रोजी दुपारी वाद झाले. यात यशवंत गुणवंत पाटील (रा.शिवपूर कन्हाळा, ता. भुसावळ) व त्याच्या सोबतच्या अनोळखी तिघांनी गजानन रतन घुले (रा. शिवपूर कन्हाळा) व घुले यांचा भाचा प्रवीण संजय जयकर (रा. मुक्ताईनगर) यांच्याशी वाद घातला. यावेळी यशवंत यांनी प्रवीण जयकर यांच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडण्यात आली. याप्रकरणी गजानन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत पाटील व त्यांच्या सोबतच्या तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बबन जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास गणेश राठोड करीत आहे.



