भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील पत्रकारांच्या सन २०२४ मध्ये १० व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया भुसावळ तालुक्याच्यावतीने लवकरच करण्यात येणार आहे. पत्रकार हा समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांचे आपल्या लेखणीतून कौतुक करतात. त्याचप्रमाणे पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्यासह प्रेरणा देण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, नाव नोंदणी दि. १८ जून २०२४ पर्यंत करावी यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी आपल्या १० वी. १२ वी उत्तीर्ण झालेल्या पाल्याचे नाव नोंदणी पुढील क्रमांकावर करावी तालुकाध्यक्ष उज्वला बागुल 9422278732 , श्रीकांत जोशी सर 9881136143 , सचिव सुनील आराक 9665981765 , उपाध्यक्ष संतोष शेलोडे 9823190903 कलीम पायलट 9423915871, सतिष कांबळे 9226580450 यांच्याकडे करावी. हा गुणगौरव सत्कार सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम २३जून रोजी भुसावळ शहरात आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचे नाव तात्काळ व्हाईस ऑफ मीडियाकडे कळवावे. विशेष म्हणजे व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने हा पत्रकारांच्या पाल्यांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला असल्यामुळे जास्तीत जास्त पत्रकारांनी आपल्या पाल्यांसह सहकुटुंब उपस्थित रहावे. नाव नोंदणी झाल्यानंतर २१ जून रोजी सत्कार समारंभ कार्यक्रमाची तारीख वेळ ठिकाण उपस्थित राहणारे मान्यवरांचे नावे कळविण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील पत्रकारांनी लवकरात लवकर आपल्या 10 वी व 12 उत्तीर्ण झालेल्या पाल्याची नावे कळवावीत असे आवाहन भुसावळ तालुकाध्यक्ष उज्वला बागुल सचिव सुनील आराक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



