मनशक्ती केंद्रातर्फे भुसावळात 23 जूनला गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन :


वरणगाव (प्रतिनिधी ) –
मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आणि स्थानिक केंद्र भुसावळ यांच्यातर्फे 23 जून रविवारी विशेष एक दिवसीय गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन डॉ. बी व्ही खाचणे मंगल कार्यालय येथे सकाळी नऊ ते साडेचार या वेळेत आयोजित केलेली आहे.
या कार्यशाळेत गुणसंपन्न व सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी तसेच, संस्कारांचे विज्ञान, गर्भ कसा वाढतो, गर्भस्थ बाळाशी कसे बोलावे, त्याचे स्वागत कसे करावे, गर्भ संगीत आणि मेंदूचा विकास, गर्भाला समज व स्मृती असते याचे वैज्ञानिक पुरावे, या सर्वांबद्दल मार्गदर्शन मनशक्ती केंद्राचे जीवनदानी साधक गीतेश कुलकर्णी करणार आहेत.

21 व्या शतकातील पिढी सक्षम व संस्कारीत असली पाहिजे यासाठी मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यातील हा एक कार्यक्रम होय. या सहभागी होण्यासाठी मनशक्ती केंद्र भुसावळ येथील साधक गिरीष पाटील 9423532535, नितीन पाटील 9422773151, विजया निकम 9403988545 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे