भुसावळ (प्रतिनिधी ) –

आपल्या राज्यात गोहत्याबंदी कायदा असल्यावर देखील गोमातेची व गोवंशाची सर्रास गाड्यामध्ये कोंबून वाहतुक केली जात आहे .हे गैरकाम कसाई व गोतस्कर करीत असून अत्यंत निर्दयीपणे गोमातेची गोवंशाची हत्या करतात
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर होणारी अमानुष बेकायदा वाहतूक थाबवावी व गोहत्या बंद करावी महाराष्ट्र प्राणी कल्याण संरक्षण कायदा कडक व्हावा यासाठी उपाययोजना करावी तसेच गोरक्षकपथक करावे जेणे करून गोमातेचे संरक्षण होईल तरी
पोलिस उपअधीक्षक यांनी बकरी ईदला व इतर वेळेस सुद्धा होणारी गोमातेची गोवंशाची हत्या थांबबावी अशी मागणी रोहित महाले निवेदनाद्वारे केली आहे .


