हिंदूसुर्य मेवाड नरेश महाराणा प्रताप यांची जयंती जल्लोषात साजरी : भव्यदिव्य मिरवणुकीने शहर दणाणले :


भुसावळ – येथे महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त राजपूत समाजातर्फे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
नहाटा कॉलेज पासून संध्याकाळी सात वाजेला मिरवणुकीस सुरुवात झाली.सजवलेल्या बग्गीत महाराणा प्रताप यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती तर महाराणा प्रताप यांच्या सजीव देखावा या मिरवणुकीत सादर करण्यात आला होता. घोड्यावर बसलेले महाराणा प्रताप यांची भुमीका सायली राजपूत तर महाराणी यांच्या भुमीकेत चैताली राजपूत हिने भुमीका सादर केली होती हे मिरणुकीतील विशेष आकर्षण होते.
प्रा. समाधान महाजन यांनी महाराणा प्रताप यांचे प्रतिमा पूजन करून मिरवणुकीस सुरुवात केली. मिरवणूक विशेषतः समाजातील सर्व महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या तर पुरुषांनी भगवे फेटे घातले होते. मिरवणूक अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने नाहाटा कॉलेज येथून निघून,जामनेर रोड,पांडुरंग टॉकीज,बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरुन वसंत टाकीज जवळील महाराणा प्रताप यांच्या स्मारकाजवळ समारोप झाला.यावेळी महाराणा प्रताप की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.
मिरवणुकीसाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष दिपाली पाटील,प्रदेश सचीव कॅप्टन राजेंद्र सिंह राजपूत,
महिला जिल्हाध्यक्ष सारिका पाटील,युवा जिल्हाध्यक्ष संदीप राणा,जिल्हा सचिव मीना राजपूत,तालुका अध्यक्ष कविता राजपूत, जयंती समिति अध्यक्ष विकी राजपूत,महिला समिती अध्यक्ष प्रमिला राजपूत,समिती उपाध्यक्ष संध्या बोदर,हर्षल बोदर यांच्या सह सर्व राजपूत समाजातील कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ – भुसावळ येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जल्लोष करताना राजपूत समाज बांधव.

भुसावळ येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महाराणा प्रताप यांचा सजीव देखावा सकारतांना सायली राजपूत