रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार मुंबई ते वाराणसी दरम्यान विशेष ट्रेन धावणार

मध्य रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि वाराणसी दरम्यान २ विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः

लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष

04229 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून शुक्रवार दि. १४.०६.२०२४ रोजी १३.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता वाराणसी येथे पोहोचेल.

04230 विशेष वाराणसी येथून बुधवार दि. १२.०६.२०२४ रोजी २२.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर, लखनऊ, अयोध्या छावनी, अयोध्या, शाहगंज आणि जौनपुर.

संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, १ वातानुकूलित-तृतीय , ७ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह १२ सामान्य द्वितीय श्रेणी (२१ डब्बे)

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 04229 चे बुकिंग दि. १२.०६.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर उघडेल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.