दि.९ रोजी नेवे वाणी समाजाचा भुसावळला वधु वर पालक मेळावा

भुसावळ – नेवेवाणी समाज विकास प्रतिष्ठाण कल्याण – मुंबई परिसर या संस्थेने नेवेवाणी समाजातील अखिल भारतीय वधु वर व पालक मेळावा भुसावळ येथे दि.९ रोजी लोणारी मंगल कार्यालयात आयोजित केला आहे.सकाळी आठ वाजता या मेळाव्यातील उपक्रमांना सुरुवात होणार आहे.
या मेळाव्यातील प्रथम सत्रात विविध वक्ते समाजाबाबत मार्गदर्शनात करणार असून सुमारे अडीचशे उपवर वधु वर या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.दोन सत्रात हा मेळावा संपन्न होणार असून यावेळी महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश या भागातील समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.भुसावळच्या समाज बांधवांचे मेळाव्यासाठी मोठे सहकार्य लाभत आहे.
या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन नेवेवाणी समाज विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुनिल पद्माकर नेवे (यावलकर) व पदाधिका-यांनी केले आहे.